
सावंतवाडी : गेली अनेक दिवस रखडलेल्या सांगेलीतील श्री सातेरी मातेच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिलेला शब्द पुर्ण केल्याने आभार मानले आहेत.
श्री. परब यांनी यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने त्यांचे आभार मानले आहेत. यामुळे आई सातेरी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांना तसेच ग्रामस्थांना या रस्त्याचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे.
अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने सर्वांच्या मनात समाधान आणि आनंद आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी पुढाकार घेणारे आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
ताजी बातमी
View all










