LIVE UPDATES

सावंतवाडीची बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज

आकाशकंदील, पणत्या आणि रोषणाईच्या साहित्याने बाजारपेठ उजळली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 07:49 PM
views 20  views

सावंतवाडी : प्रकाशाचा उत्सव मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणाची जय्यत तयारी सावंतवाडी शहर आणि परिसरात पाहायला मिळत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे आकर्षक आकाश कंदील दाखल झाले आहेत. पारंपरिक कागदी कंदील, कापडी, इको-फ्रेंडली तसेच आधुनिक डिझाईनच्या कंदिलांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. यासोबतच पारंपरिक पणत्या, विविध रंगांतील डिझायनर पणत्या, सुवासिक मेणबत्त्या आणि रांगोळीचे रंग विक्रीसाठी उपलब्ध झालेत.

घरांना आकर्षक रोषणाई करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या एलइडी लाईट्स, सिरिज आणि विविध रंगांच्या लाईटिंग पट्ट्यांनी दुकाने उजळून निघाली आहेत. सुशोभिकरण साहित्यासोबतच कंदील आणि पणत्या खरेदीसाठी नागरिक उत्साहाने बाहेर पडत असून बाजारपेठेत सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच चमचमीत दिवाळी फराळ देखील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. स्थानिक व्यापारी आणि कारागिरांनी यंदा विविधतेवर भर दिला असून पुढील काही दिवसांत खरेदीचा हा उत्साह आणखी वाढणार आहे.


ताजी बातमी

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026