LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 08:13 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी जाहीर करण्यात आली आहे.

शासनाच्या राजशिष्टाचार विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च १९८३ रोजीच्या अधिसूचनेन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा बदल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीतील अ.क्र. ३ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. हा बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

ताजी बातमी

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
संबंधित बातम्या