सिंधुदुर्ग : गोवा राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे यांची गोव्यातून राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजन तेली व पदाधिकारी यांनी गोव्यात सदिच्छा भेट त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिल्हाध्यक्ष तेली यांचेसंमवेत जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत मळीक उपस्थित होते.
गोवा विधासभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर पुन्हा एकदा बिनविरोध राज्यसभा काबीज करत गोव्यात भाजपाचा वरचष्मा कायम असल्याचे स्पष्ट झालं आहे. गोव्यात व लगतच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अगदी सलोख्याचे सबंध आहेत. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही ठिकाणचे राज्यांपासून ते जिल्ह्यापर्यंत भाजप नेते, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वच बाबतीत एकमेकांना सपोर्ट करत असतात. याच पार्श्वभूमीवर गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदांनदशेठ तानावडे यांची बिनविरोध राज्यसभा निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना बळ देणारी असल्याचे या भेटीत पदाधिकारी यांनी आवर्जून सांगत सिंधुदुर्ग भाजपा पार्टीकडून तेली व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.