LIVE UPDATES

महाचॅनेलच्या पहिल्याच मालवणी बुलेटीनला थेट अमेरीकेतुन प्रतिसाद !

कोकणी भाषा आईकान काळजाक खूप खूप बरा वाटला...दर्शकांच्या प्रतिक्रियांनी टीम कोकणसादला नवं पाठबळ !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 12:13 PM
views 605  views

सिंधुदुर्ग : देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर आज कोकणचं नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद लाईव्हनं ऐतिहासिक पाउल टाकलं आणि जगातल्या पहिल्या मालवणी बुलेटीनचं शानदार लॉंचिंग झालं. या मालवणी बुलेटीनचं प्रसारण होताच अवघ्या काही तासात महाचॅनेलवर कौतुकाचा वर्षाव झाला. अगदी थेट अमेरीकेतुन मालवणी बुलेटीनचं कौतुक करणा-या प्रतिक्रीया आल्या. जगभरातील दर्शकांच्या या कौतुक आणि पाठबळाबद्दल टीम कोकणसाद लाईव्हनं सर्वांचे आभार मानलेत. पाहुयात यातील काही निवडक प्रतिक्रिया.. 






जगातला पयला मालवणी बुलेटीन | 'बातम्यो मालवणी' !

पाहण्यासाठी क्लिक करा !

👇👇

https://youtu.be/TkoahGL51uw

--------------