LIVE UPDATES

Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई

नगराध्यक्षांचे प्रशासनाला आदेश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:37 PM
views 18  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : शहरात सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांच्या कडेला उघड्यावर सुरू असलेल्या अनाधिकृत मासे विक्रीमुळे पसरणारी दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी परवानाधारक मच्छी विक्रेत्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडे निवेदन देत योग्य त्या न्याय व कारवाईची मागणी केली होती. याची गांभीर्याने दखल घेत सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी शहरात उघड्यावर मासे विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. 

शहरातील कोणत्याही विक्रेत्याने रस्त्यावर किंवा अनधिकृत ठिकाणी उघड्यावर मासे विक्री न करता नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत 'फिश मार्केट' मध्ये येऊनच आपला व्यवसाय करावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.  या आवाहनानंतरही जर कोणी सार्वजनिक ठिकाणी किंवा उघड्यावर मासे विक्री करताना आढळल्यास, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कडक प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला नगराध्यक्षांनी दिले.  सावंतवाडी शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी व विक्रेत्यांनी सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, दुलारी रांगणेकर सुनिता पेडणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले आदी नगरसेवक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.
Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पडेल नं 1 शाळेत ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन
November 05, 2026