LIVE UPDATES

IPO News : गुंतवणूकीची संधी! २६ ऑक्टोबरपासून 'या' ९ कंपन्यांचे आयपीओ खुले होणार, जाणून घ्या किंमत अन् तारखा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 04:08 PM
views 76  views
9 Upcoming IPOs Opening This Week from October 26, 2026

नवी दिल्ली : मेनबोर्ड सेगमेंटमधील ५ कंपन्यांचे आयपीओ २६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात खुले होणार आहेत. तसेच एसएमई सेगमेंटमधील ४ कंपन्यांचे आयपीओ देखील येणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना या आठवड्यात एकूण ९ कंपन्यांच्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करता येणार आहेत. चला, या प्रत्येक आयपीओबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

ईएएए इंडिया अल्टरनेटिव्हज आयपीओ (EAAA India Alternatives IPO) 

या आयपीओची साईज १,२०० कोटी रुपये आहे. हा आयपीओ २६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी खुला राहील. यासाठी प्राइस बँड प्रति शेअर १,५८५ ते १,६६५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ९ शेअर्सच्या लॉट साइजसह, गुंतवणूकदारांना किमान १४,९८५ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ग्रे मार्केटमध्ये, हा आयपीओ सध्या ५२ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करीत आहे.

एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज आयपीओ (SFC Environmental Technologies IPO)

हा आयपीओ २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी खुला राहील. आयपीओचा आकार ६६७.५३ कोटी रुपये असून, प्रति शेअर ३१३ ते ३३० रुपयांचा प्राईज बॅंड निश्चित करण्यात आला आहे. ४५ शेअर्सच्या लॉट साइजसाठी किमान १४,८५० रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. या आयपीओसाठी ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) प्रति शेअर ३२ रुपये इतका आहे.

बीएलएस पॉलिमर्स आयपीओ (BLS Polymers IPO) 

या आयपीओसाठी प्रति शेअर १४२ ते १५० रुपये प्राईज बॅंड निश्चित करण्यात आली आहे. १०० शेअर्सच्या लॉट साइजसह, गुंतवणूकदारांना किमान १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा आयपीओ २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत खुला राहील. ग्रे मार्केटमध्ये, हा आयपीओ ३८ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

विस्कॉन इंडस्ट्रीज आयपीओ (Wiscon Industries IPO) 

या कंपनीच्या आयपीओची साईज ११० कोटी रुपये आहे. हा आयपीओ २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत खुला राहील. यासाठी प्रति शेअर १९४ ते २०४ रुपयांचे प्राईज बॅंड निश्चित करण्यात आला आहे.

एम.के. सन्स फाईन ज्वेलस आयपीओ (M.K.Sons Fine Jewels IPO) 

हा आयपीओ २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत खुला राहील. आयपीओची साईज २७५.४० कोटी रुपये असून, प्रति शेअर किंमत बँड १५३ ते १६२ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

अजवा प्रोजेक्ट्स आयपीओ (Ajwa Projects IPO) 

या आयपीओचा आकार ३८.०५ कोटी रुपये आहे. यात नवीन शेअर्सची विक्री आणि ऑफर फॉर सेल या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. हा आयपीओ २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत खुला राहील. प्रति शेअर किंमत बँड २०३ रुपये निश्चित करण्यात आला असून लॉट साईज ६०० शेअर्सची आहे.

कार्व्हर रोबोवेल्ड आयपीओ (Carver Roboweld IPO) 

हा एसएमई सेगमेंटमधील आयपीओ आहे. २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील आणि यासाठी प्रति शेअर किंमत बँड ७६ ते ८० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

अंताला इंडस्ट्रीज आयपीओ (Antala Industries IPO) 

हा देखील एसएमई सेगमेंटमधील आयपीओ असून याची साईज २३.३३ कोटी रुपये आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. हा आयपीओ २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत खुला राहील.

बॉम्बे कोटेड अँड स्पेशल स्टील्स आयपीओ (Bombay Coated & Special Steels IPO) 

हा मेनबोर्ड सेगमेंटमधील आयपीओ असून याची साईज १८३.०६ कोटी रुपये आहे. यासाठी प्रति शेअर किंमत बँड ७८ ते ८२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओसाठी जीएमपी ८ रुपये इतका आहे.

(डिस्क्लेमर : माहिती शेअर करण्याच्या उद्देशाने हा लेख देण्यात आला आहे. गुंतवणुकीचा सल्ला या लेखात देण्यात आलेला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे स्वतःच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणुक करा. गुंतवणूक करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा...)


ताजी बातमी

View all

Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
Inter-college Taekwondo Championship inaugurated at Gogate-Jogalekar College, with 200 athletes participating from 51 colleges.
Ratnagiri News : कोकणातून जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला जावेत
October 25, 2026
लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा
October 25, 2026
 Shri Devi Mauli Temple in Sonurli, Sawantwadi, famous for its annual Lotangan Jatra
प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

Florida Shooting Near University Stadium
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विद्यापीठाजवळ गोळीबार, ६ मुलांसह १२ जण जखमी
October 25, 2026
Philippines Air Force Plane Crash : फिलिपिन्समध्ये हवाई दलाच्या दोन प्रशिक्षण विमानांची हवेत धडक
October 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
गोव्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था होणार अधिक बळकट
October 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
टीव्ही चॅनेल्सच्या मनमानीला केंद्र सरकारचा लगाम
October 22, 2026