LIVE UPDATES

प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 03:12 PM
views 126  views
 Shri Devi Mauli Temple in Sonurli, Sawantwadi, famous for its annual Lotangan Jatra

सावंतवाडी : दक्षिण कोकणात लोटांगणासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक अलौकिक जत्रोत्सव बुधवार २५ नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा होणार आहे. नवसाला पावणारी जागृत देवता आणि कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्लीतील श्री देवी माऊलीच्या या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

सोनुर्लीचा जत्रोत्सव हा त्याच्या विशेष परंपरेसाठी आणि अलौकिक लोटांगणासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. आपल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक या दिवशी सोनुर्लीत दाखल होतात. मंदिराच्या प्रांगणात भाविकांनी घातलेले लोटांगण हा या जत्रोत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू असतो.

जत्रोत्सवानिमित्त देवी माऊलीची आकर्षक पूजा व अलंकार परिधान करून विशेष रूप सजवले जाणार आहे. पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात होणार असून भाविकांसाठी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी भाविक नवस फेडण्यासाठी मंदिराभोवती लोटांगण घालणार आहेत.

कोकणसह गोवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक सोनुर्लीत दाखल होणार असल्याने देवस्थान कमिटी व स्थानिक प्रशासनाकडून दर्शन रांग, वाहतूक व्यवस्था व सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व भाविकांनी या अलौकिक लोटांगण सोहळ्याचा व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

India A vs Pakistan A match in Men’s Asia Cup Rising Stars 2026 in Doha
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे वेळापत्रक जाहीर
October 25, 2026
Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
Inter-college Taekwondo Championship inaugurated at Gogate-Jogalekar College, with 200 athletes participating from 51 colleges.
Ratnagiri News : कोकणातून जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला जावेत
October 25, 2026
लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा
October 25, 2026
Handmade Diwali diyas, lanterns and handicrafts made by students of Abhyankar Deaf School in Ratnagiri
Ratnagiri News : मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शुभेच्छापत्र, आकाशकंदील
October 25, 2026
 Kankavli Highway Police appeal to motorists to follow traffic rules and prevent road accidents in Sindhudurg.
“वेगापेक्षा जीवन अनमोल!” हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा
October 25, 2026