LIVE UPDATES

लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 04:22 PM
views 44  views

सिंधुदुर्ग : नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीविरोधात पुढे येऊन निर्भयपणे विभागाशी संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने 'भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६' निमित्त नागरिकांना करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस निरीक्षक दिपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.

लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक: १०६४, कार्यालयीन व्हाट्सॲप क्रमांक : ९९२२८९१०६४, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: ०२३६२-२२२२८९ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल: भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. "लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका" असा संदेश यामध्ये देण्यात आला आहे.  

यंदा भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या वर्षीची संकल्पना "सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे" अशी आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे मूल्य जोपासत भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गमार्फत करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

RPI Sindhudurg President Ajit Kadam
सिंधुदुर्गातील करपलेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे करा
October 25, 2026
India A vs Pakistan A match in Men’s Asia Cup Rising Stars 2026 in Doha
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे वेळापत्रक जाहीर
October 25, 2026
Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
Inter-college Taekwondo Championship inaugurated at Gogate-Jogalekar College, with 200 athletes participating from 51 colleges.
Ratnagiri News : कोकणातून जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला जावेत
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

RPI Sindhudurg President Ajit Kadam
सिंधुदुर्गातील करपलेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे करा
October 25, 2026
Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
 Shri Devi Mauli Temple in Sonurli, Sawantwadi, famous for its annual Lotangan Jatra
प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला
October 25, 2026
Handmade Diwali diyas, lanterns and handicrafts made by students of Abhyankar Deaf School in Ratnagiri
Ratnagiri News : मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शुभेच्छापत्र, आकाशकंदील
October 25, 2026