LIVE UPDATES

Ratnagiri News : कोकणातून जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला जावेत

डॉ. मनोज रेड्डी यांचे प्रतिपादन : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्पर्धेचे शानदार उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 04:39 PM
views 51  views
Inter-college Taekwondo Championship inaugurated at Gogate-Jogalekar College, with 200 athletes participating from 51 colleges.

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठात दरवर्षी ४० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात, यातून यंदापासून प्रथमच सर्वोत्कृष्ठ खेळाडू पुरुष व महिला निवडण्यात येणार आहे. तसेच क्रीडा संचालकांना पारितोषिक आणि मिशन ऑलिंपिक मोडवर प्रशिक्षकांसाठीही विशेष तरतूद करण्यात येत आहे, कोकणातूनही जास्तीत जास्त खेळाडू ऑलिंपिकला गेले पाहिजेत याकरिता विद्यापीठाच्या किमान ५ ते १० स्पर्धा कोकणातच व्हायला हव्यात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी रविवारी येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सुरू झाल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी जिमखाना विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तायक्वांदो निवड समिती सदस्य डॉ. विश्वंभर जाधव, डॉ. आदित्य कुलकर्णी, जयदीप कदम, तायक्वांदो आंतरराष्ट्रीय रेफ्री सुभाष पाटील, तायक्वांदो असोसिएशने अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रबंधक नंदकिशोर गोळपकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते. स्पर्धेत ५१ महाविद्यालयांतून १०० पुरुष व १०० महिला स्पर्धकांनी भाग घेतला असून चार दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत.

या स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी राजस्थान आणि नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायक्वांडो स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तायक्वांडो हा खूप शिस्तीचा खेळ असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात भारताला पदक मिळाले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांपासून या स्पर्धा सेन्सरवर घेत आहोत. नवीन नियमांचा अवलंब केला जात असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचही येतात. खेळाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठातर्फे खेळाडूचे वजन केले जाते, वेळापत्रक सर्वांसमोरच तयार केले जात असल्याचे डॉ. रेड्डी म्हणाले.


ताजी बातमी

View all

RPI Sindhudurg President Ajit Kadam
सिंधुदुर्गातील करपलेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे करा
October 25, 2026
India A vs Pakistan A match in Men’s Asia Cup Rising Stars 2026 in Doha
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे वेळापत्रक जाहीर
October 25, 2026
Sahyadri Polytechnic assistant professor Harshala Rajeshirke receives a design patent for her animal detection and monitoring device.
Animal Detection Device Patent : चिपळूणच्या हर्षला राजेशिर्के यांना केंद्र सरकारचे 'डिझाईन पेटंट' मंजूर
October 25, 2026
लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

India A vs Pakistan A match in Men’s Asia Cup Rising Stars 2026 in Doha
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे वेळापत्रक जाहीर
October 25, 2026
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारच्या विद्यार्थिनींचे यश
October 25, 2026
 Pankaj Advani Wins 29th World Title, Defeats Rob Hall in Billiards Final
Pankaj Advani : पंकज अडवाणीने २९ वे विश्वविजेतेपद जिंकून घडवला नवा इतिहास
October 24, 2026
देवगडच्या एस. एच. केळकर महाविद्यालयाची ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी
October 24, 2026