
वेंगुर्ला : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय निधीतून महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वेंगुर्ला विभागांतर्गत रेडी येथील माऊली मंदिर ते रेडी बंदरपर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ४ कोटी २६ लाख ७१ हजार ५३८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
रेडी येथील माऊली मंदिर ते बंदरापर्यंतचा रस्ता स्थानिक नागरिकांसह, प्रसिद्ध देवस्थान रेडी गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तसेच बंदरावर ये-जा करणाऱ्या व्यावसायिक आणि अन्य प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे वाहतुकीची सुविधा अधिक चांगली होण्यास मदत होणार असून, परिसरातील दळणवळणालाही गती मिळणार आहे. या विकासकामामुळे रेडीच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, प्रियांका घाटवळ, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, रेडी उपसरपंच आनंद भिसे, सदस्य नमिता नागोळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, लक्ष्मीकांत कर्पे, माजी सरपंच मनोज उगवेकर, कमलेश गावडे, राहुल गावडे, अमित गावडे, सागर राणे, विनायक कांबळी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि रेडी पोर्टचे अधिकारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








