LIVE UPDATES

Blue Economy : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी

गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज : मंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 05:27 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज असून राज्यात गुंतवणूक करून उद्योग उभारावेत आणि जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील भारताच्या प्रगतीचे भागीदार व्हावे, असे आवाहन मत्स्यवयसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिक्कीच्या व्यासपीठावरून केले. 

या समिटमध्ये नेदरलँड्स, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या नऊ देशांनी सहभाग नोंदवला. यावेळी विजय शंकर-अध्यक्ष FICCI, ध्रुव कोटक-अध्यक्ष, FICCI शिपिंग आणि पोर्ट्स समिती, थियरी व्हॅन हेल्डेन-उपमुख्य वाणिज्यदूत, नेदरलँड्सचे वाणिज्यदूतावास, मुंबई, कॅप्टन अबुल कलाम आझाद- सागरी सल्लागार व अतिरिक्त महासंचालक (नौदल), महासंचालनालय सागरी प्रशासन, भारत सरकार, कॅप्टन बिनेश त्यागी-अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गौरव दयाल-अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, एन.बी.एस. राजपूत-प्रधान सचिव, वाणिज्य व परिवहन विभाग, ओडिशा सरकार, श्री प्रदीप पी.-मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आदी उपस्थित होते.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्यावतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी महाराष्ट्राच्या पोर्ट आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी, पायाभूत सुविधांचा विकास, तसेच या क्षेत्राच्या भविष्यातील योजनांबाबत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विजय शंकर, ध्रुव गौतम, कॅप्टन अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे गौरव दयाल, नेदरलॅंडचे जेरीवेल हेल्डन, शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी, ओडिशा कॉमर्स आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव एन बी एच राजपुत, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था यामुळे बंदर उद्योगासाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. राज्यातील मेरिटाइम क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना देण्यात येत असून, या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत.

बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील संधींना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वन विंडो क्लिअरन्स’सारख्या सुविधांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या सागरी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पनांवर भर देण्यात येत आहे. मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे तसेच निर्यातीला चालना देणे, या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या नैसर्गिक भौगोलिक सामर्थ्याला औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देऊन राज्याच्या बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येत आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रातील उपलब्ध संधींचा लाभ घेऊन बंदर व जहाज बांधणी, दुरुस्ती क्षेत्रात उद्योग उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचा विस्तार होणार नाही, तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनविण्याच्या दिशेने ही समिट निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


ताजी बातमी

View all

Rajapur's Riya Mukesh Mayekar wins a gold medal at the Mumbai University Intercollegiate Taekwondo Championship 2026-27.
आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मयेकरला सुवर्णपदक
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड
November 02, 2026
Karbonn Rebel and Karbonn Rebel Pro smartphones launched in India with 7000mAh battery and 64MP camera.
भारतीय बाजारात १३ हजारांपेक्षा कमी किमतीत 'कार्बन'चे दोन स्मार्टफोन लॉन्च, ७००० एमएएच बॅटरीसह मिळणार खास फीचर्स
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
तांबुळी माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रेडी माऊली मंदिर ते बंदर रस्त्यासाठी ४ कोटी २६ लाख मंजूर
November 02, 2026