
सिंधुदुर्ग : मत्स्य व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे, या क्षेत्रातील व्यावसायिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने MSC बँकेच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कोकण विभागीय कार्यशाळा सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. मच्छीमार व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत नाबार्डचे अधिकारी, मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक योजना, कर्जपुरवठा आणि सहकाराच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाचा विस्तार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्य व्यावसायिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजवण्याचे काम आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. मत्स्य व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे, मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, तसेच सहकाराच्या माध्यमातून या व्यवसायाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नाबार्ड आणि मत्स्य सहकारी संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत मत्स्य व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना, आर्थिक सहाय्य आणि कर्जपुरवठ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, नाबार्डचे अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी आणि मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासोबतच सहकाराचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








