LIVE UPDATES

FSSAI Liquor Ban India : ओल्ड मॉन्क, मॅकडॉल्स अन् रॉयल चॅलेंजसह या 5 लोकप्रिय मद्यांच्या विक्रिवर भारतात बंदी

Whisky brands banned in India : एफएसएसएआयने काही मद्याच्या ब्रॅंडवर कारवाई केली आहे. कारवाईत एंटीक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स एक्सएक्सएक्स रम, ओल्ड मॉंकच्या तीन प्रकारांच्या विक्रिवर बंदी घालण्यात आली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 13:19 PM
views 111  views
Bottles of popular Indian-made foreign liquor brands facing regulatory checks

Liquor Brands Banned : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) काही मद्य कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. मद्यात आर्टिफिशियल फ्लेवर तसेच मॅन्युफॅक्चरिंग स्टॅंडर्डसच्या नुसार मद्य नसल्याने एफएसएसएआयतर्फे कारवाई करण्यात आली. याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, काही मद्य उत्पादन कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांवर सध्याच्या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे. यामध्ये रम आणि व्हिस्कीसारख्या सामान्य मद्यपेयांचा अस्सल सुगंध आणि चवीची नक्कल करणाऱ्या फ्लेवर्सच्या वापराचा समावेश आहे.

भारतात या ब्रॅंडसच्या रम, व्हिस्कीवर बंदी

एफएसएसएआयने काही मद्याच्या ब्रॅंडवर कारवाई केली आहे. कारवाईत एंटीक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स एक्सएक्सएक्स रम, ओल्ड मॉंकच्या तीन प्रकारांच्या विक्रिवर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाने उघड केले की, तपासात असे दिसून आले की काही उत्पादक प्रामुख्याने स्पिरिट्स किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल पासून मद्य तयार करत होते आणि नंतर रम आणि व्हिस्कीसारख्या उत्पादनांचा वास आणि चव मिळवण्यासाठी त्यात बाह्य फ्लेवर्स मिसळत होते.

मंत्रालयाने पुढे नमूद केले की, पॅकेजिंगच्या पुढील बाजूस उत्पादनाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नव्हती. अनेक उत्पादकांकडून आलेल्या रम आणि व्हिस्कीच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचणीत त्यामध्ये बाह्य कृत्रिम किंवा नैसर्गिक स्वादांचे अस्तित्व आढळून आले आहे.