LIVE UPDATES

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 17:23 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेणार असून, ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबतही आढावा बैठक घेणार आहेत.मंत्री दादाजी भुसे यांचे मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०५ वाजता सावंतवाडी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते सावंतवाडीहून कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करून तेथे मुक्काम करतील.

बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत त्यांचा शाळा भेटीचा कार्यक्रम होणार आहे. या भेटीदरम्यान ते शाळांमधील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणार आहेत.दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, सायंकाळी ६ वाजता मंत्री दादाजी भुसे सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहेत.