LIVE UPDATES

भाजप सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी ॲड. सिद्धार्थ भांबुरे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 10:26 AM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

यासाठी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शिफारस केली होती. त्यानुसार ही निवड करण्यात आली असून अभ्यासू व सामाजिक कार्यात सक्रीय असणारे श्री. भांबूरे असल्याने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.