LIVE UPDATES

गोधडीत गुंडाळून फेकला वृद्धाचा मृतदेह

इन्सुली डोबाशेळ तिलारी कालवा येथील घटना ; घातपाताचा संशय
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 12:05 PM
views 48  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : इन्सुली डोबाशेळ येथील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह गोधडीत गुंडाळून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कालव्याच्या पाण्यात संशयास्पद मृतदेह तरंगताना दिसत असून घातपात करुन मृतदेह कालव्यात फेकला असल्याचा संशय बळावला आहे. स्थानिक ग्रामस्थांना तिलारी कालव्यात मृतदेह दिसून आल्यानंतर पोलिसांना कल्पना दिली‌. मृतदेहाच्या शेजारी एक गोधडी असून रात्रीच्या वेळी तो टाकला असल्याचा संशय आहे. पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. तर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.