LIVE UPDATES

पेडणेत २५ जानेवारीपासून सिनेमा लॅब६ 'फिल्ममेकींग वर्कशॉप' !

Edited by: ब्युरो
Published on: January 06, 2024 11:11 AM
views 539  views

पेडणे :  पेडणे येथील पेडणेकर प्रोडक्शन यांच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या सिनेमा लॅब६ या "फिल्ममेकींग वर्कशॉप"चे आयोजन पेडणे येथे करण्यात आले आहे. हे वर्कशॉप २५ ते २८ या काळात पेडणे येथे होणार आहे.

    कोकण आणि गोव्यातील मुलांना वेगळे काही तरी शिकता यावे या उद्देशाने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पेडणेकर प्रोडक्शनचे सागर पेडणेकर यांनी दिली. यात प्रशिक्षण देणारे श्री. इंडीकर यांनी बर्लीन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'क्रिस्टल बेअर' शांघाय 'एशियन न्यू टॅलेंट अवार्ड', यंग सिनेमा अवार्ड, राष्ट्रीय रजत कमल हा नॅशनल अवार्ड मिळवून यश संपादन केले आहे. त्यांच्या माध्यमातून या वर्कशॉप मध्ये जास्तीत-जास्त कलाकार आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधावा

9527509737