
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकर्त्यांनी आज पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश थेट कृतीतून दिला. आज सोमवारी सकाळी ८ वाजताच काजरघाटीचा परिसर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दणाणून गेला. काजरघाटी, पिलणकरवाडी स्टॉपवरून सर्वजण एकत्र येऊन पोमेंडी खुर्द - बौद्धवाडी पुलावर पोहोचले आणि खऱ्या अर्थाने युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली.
या सामाजिक कार्यात शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, निलेश आखाडे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, विक्रम जैन, अद्वैत कुलकर्णी, अजिंक्य केसरकर, राजू भाटलेकर, मोहन पटवर्धन, शेखर लेले, नितीन गांगण, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, निखिल घाग, गिरीधर पटवर्धन, आशिष मोरे, आयुष ढेकणे, प्रसाद बाष्ठे, दिलीप पटवर्धन, तेरेदेसाई, सौरभ पवार, श्रीपाद पोकळे आदी. यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








