LIVE UPDATES

Tata Cars Price Discount : टाटाच्या या 5 गाड्यांवर मिळतोय 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट, वाचा सविस्तर

Latest Tata Car Discounts This Month : या कॅटेगरीमध्ये टाटा कर्व्ह, टाटा अल्ट्रोज, टाटा हॅरियर, टाटा सफारी आणि टाटा टिगॉर यांचा समावेश आहे. या कालावधीत ग्राहक या गाड्यांवर १.२५ लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. या ऑफरमध्ये रोख सवलतीसोबतच इतर फायद्यांचाही समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या गाडीवर किती रुपयांपर्यंत डिस्काऊंट आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 13:56 PM
views 101  views

Discount On Tata Cars : जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या पेट्रोल आणि डिझेल कारवर डिस्काउंट देत आहे. या कॅटेगरीमध्ये टाटा कर्व्ह, टाटा अल्ट्रोज, टाटा हॅरियर, टाटा सफारी आणि टाटा टिगॉर यांचा समावेश आहे. या कालावधीत ग्राहक या गाड्यांवर १.२५ लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. या ऑफरमध्ये रोख सवलतीसोबतच इतर फायद्यांचाही समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या गाडीवर किती रुपयांपर्यंत डिस्काऊंट आहे.

टाटा अल्ट्रॉज (tata altroz Discount)
टाटा अल्ट्रॉजवर 55 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. अल्ट्रॉज ही टाटाची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल, आय सीएनजी आणि १.५ लिटर डिझेल इंजिनचे हे पर्याय उपलब्ध आहेत. याची एक्स शोरूम किंमत ६.३० लाख ते १०.८० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार तुम्ही खरेदी केल्यास तुम्हाला डिस्काऊंट पॅकेजमध्ये १५ हजार रुपयांची रोख डिस्काउंट, २० हजार रुपयांची 'फ्रीडम ऑफर' आणि २० हजार रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज किंवा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. 

टाटा हॅरियर आणि सफारी (Tata Harrier And Safari Discount)
टाटाच्या हॅरियर आणि सफारी या कार खरेदी केल्यास ग्राहकांना 45 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट मिळणार आहे. यामधील टाटा हॅरियरती एक्स शोरुम किंमत 14.99 लाख ते 25.89 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सफारीची एक्स शोरुम किंमत 15.49 लाखांपासून 26.79 लाख रुपये एवढी आहे.

टाटा कर्व्ह (Tata Curvv SUV Discount)
टाटाच्या कूप एसयूव्हीवर ऑगस्टमध्ये 1.25 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. या कूप एसयूव्हीचा स्पोर्टी लूक आहे. एसयूव्हीमध्ये १.२ लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेलच्या शक्तिशाली इंजिनचा पर्याय उपलब्ध आहेत. याची एक्स शोरूम किंमत अंदाजे ९.६९ लाख ते १९.१० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. कार खरेदी केल्यास डिस्काउंटच्या पॅकेजमध्ये 30 हजार रुपयांचा डायरेक्ट डिस्काउंट, 40 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस तसेच तुम्ही तुमची जुनी गाडी दिल्यास स्कॅपचे 45 हजार रुपये आसा लाभ मिळू शकतो.  

टाटा टिगॉर (Tata Tigor Discount)
कॉम्पॅक्ट सेडान 'टिगॉर'वर एकूण ३० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये १५ हजार रुपयांच्या रोख डिस्काउंटचा समावेश आहे. ही कार १.२ लिटर पेट्रोल इंजिन किंवा आयसीएनजी इंजिनच्या पर्यायासह येते. तिची एक्स-शोरूम किंमत ५.५५ लाख ते ८.८4 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

डिस्क्लेमर : या बातमीत दिलेली माहिती ही विविध स्रोतांवर आधारीत असल्याने तुमच्या शहरातील डिलरकडे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमध्ये फरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.