LIVE UPDATES

मराठी शाळांना गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : सुरेश गवस

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 04:08 PM
views 39  views

सावंतवाडी : मराठी शाळा आमच्यासाठी मंदिर असून शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आम्ही यशस्वी झालो, त्यामुळे पालकांनी आपली मानसिकता बदलून मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहन माडखोल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा माजी विद्यार्थी सुरेश गवस यांनी केले.

सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे पत्रकार कै. बबन गवस यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू सुरेश गवस यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. तसेच माजी विद्यार्थी मुनाफ शेख यांनी वडील पिरसाब शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन पंखे व अन्य वस्तू शाळेला भेट दिल्या. या वस्तूंचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस माजी विद्यार्थी अमोल टेंबकर,मुख्याध्यापक शुभलता सुकी रश्मी पावसकर आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री. गवस म्हणाले, मराठी शाळेतून शिक्षण घेताना कोणतीही कमतरता जाणवली नाही. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षक, शासन आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. माजी विद्यार्थी संघाकडून शाळेच्या विकासासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असून, अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही गवस यांनी सांगितले.

माजी नगरसेवक विलास जाधव यांनी शाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शाळा दत्तक घेतली आहे शाळेतील स्वच्छतागृहांसह अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शाळेत बालवाडी सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी  शाळेला चांगले दिवस आणण्यासाठी येथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र शौचालय आणि बालवाडी चा प्रश्न मोठा आहे तो सुटल्यास निश्चितच शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत  होईल असा दावा केला त्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.


ताजी बातमी

View all

घुंगुरकाठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन
October 29, 2026
नव्या नळपाणी योजनेचे टेस्टिंग पूर्ण होईपर्यंत जुनी जलवाहिनी सुरू ठेवा
October 29, 2026
Nitesh Rane reviews CM Matsya Sampada Yojana implementation on MahaDBT 2.0
महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करा : मंत्री नितेश राणे
October 29, 2026
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग जनजागृती
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

घुंगुरकाठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन
October 29, 2026
नव्या नळपाणी योजनेचे टेस्टिंग पूर्ण होईपर्यंत जुनी जलवाहिनी सुरू ठेवा
October 29, 2026
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग जनजागृती
October 29, 2026
Devgad Hapus mangoes grown by farmer Nilesh Bandkar sent to Vashi Market
Devgad Hapus Mango : हंगाम सुरू व्हायच्या आधीच देवगडचा हापूस वाशी मार्केटमध्ये
October 29, 2026