
सावंतवाडी : शहरातील संजीव निपाणीकर यांच्या चप्पल दुकानास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या दुर्घटनेमुळे निपाणीकर यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना त्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भाजपच्यावतीने निपाणीकर यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली.
या मदतकार्यात सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पुढाकार घेतला.भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजीव निपाणीकर यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मदतीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकाला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळला आहे.
भाजपच्यावतीने देण्यात आलेली ही रोख आर्थिक मदत सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते संजीव निपाणीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








