
नवी दिल्ली : गेल्या २१ दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या जंतर मंतर येथील बेमुदत उपोषणाला आज वेगळं वळण लागलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केले, परंतु, पोलिसांनी आज त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांना हलवलं आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी आता देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भातील त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.














