
मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. आज 29 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर चांदी 620 रुपयांनी वधारल्याने 2 लाख 17 हजार रुपयांवर दर आहे.
मंगळवार, 29 जुलै रोजी सोन्याच्या दरात 1.17 टक्क्यांनी घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 42 हजार रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपये इतका आहे. सोन्याच्या दरांमध्ये शहरांनुसार बदर असू शकतात.
मुंबईतील आजचे सोने व चांदीचे दर
मुंबईत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,०२० रुपये आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,१८५ रुपये आहे. तर चांदीचा प्रतिकिलो भाव 2 लाख 17 हजार 100 रुपये ऐवढा आहे. जून महिन्याच्या अखेरीपासून सोन्याचे भाव प्रति औंस ४,००० डॉलर्सच्या आसपास राहिले आहेत. सोन्याने यापूर्वी प्रति औंस सुमारे ५,६०० डॉलर्सचा उच्चांक गाठला होता, परंतु त्यानंतर त्यात २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील फरक
२४ कॅरेट सोने हे सुमारे ९९.९ टक्के शुद्ध असते, म्हणूनच त्याची सर्वाधिक किंमत असते. मात्र, ते खूप मऊ असल्याने त्याचा वापर सहसा दागिने बनवण्यासाठी केला जात नाही. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
बीआएस हॉलमार्क आणि एचयूआयडी नंबर तपासूनच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करा.














