LIVE UPDATES

Love and War movie : रणबीर कपूरच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, 'या' तारखेला येणार चित्रपटगृहांमध्ये

Love and War poster : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित अभिनेता रणबीर कपूरच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित पोस्टरमधून रणबिरचा चित्रपटातील लूक समोर आला आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 24, 2026 13:16 PM
views 64  views
Love & War poster featuring Ranbir Kapoor, Alia Bhatt and Vicky Kaushal

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'रामायण' हा चित्रपट ६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे, तर यश रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटानंतर रणबीरचा 'लव्ह अँड वॉर' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित अभिनेता रणबीर कपूरच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित पोस्टरमधून रणबिरचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. 

पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, तो रुबाब, ते व्यक्तिमत्त्व आणि ती जिद्द! संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होत आहे." प्रदर्शित पोस्टरमध्ये रणबीर एका निळ्या रंगाच्या क्लासिक कारच्या ड्रायव्हर सीटवर बसलेला आहे. पांढरा टी-शर्ट, गॉगल अशा वेशभूषेत तो दमदार दिसत आहे. त्याचा हात कारच्या बाहेर असून हातावर गोळी लागून झालेल्या जखमेच्या तसेच रक्ताच्या खुणा दिसत आहेत. या लूकमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीरचा 'लव्ह अँड वॉर' चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी ऋषभ शेट्टीचा 'छत्रपती शिवाजी महाराज' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऋषभ शेट्टी 'कांतारा' या चित्रपटामुळे विशेष लोकप्रिय झाला आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपट प्रदर्शित होत असल्याने बॉक्स ऑफिसवर एक रंजक लढत पाहायला मिळू शकते.