सिंधुदुर्गातील प पू श्री दत्तानंद सरस्वती स्वामींना अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण !

Edited by: ब्युरो
Published on: January 18, 2024 11:57 AM
views 894  views

सिंधुदुर्ग : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची धामधूम सगळीकडे पाहायला मिळतेय. सर्वत्र उत्साहाच वातावरण आहे. देशभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रम होतायत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय. सिंधुदुर्गातील प. पू. श्री दत्तानंद सरस्वती स्वामी यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण आलंय. 


प. पू. श्री दत्तानंद सरस्वती स्वामी वेंगुर्ला येथील दाभोली मठाचे पीठाधीश आहेत. निमंत्रण मिळताच ते अयोध्येला रवाना झालेत. या सोहळ्यात त्यांचाही सहभाग असणार आहे. अयोध्येतील सोहळ्याच निमंत्रण मिळणारे ते सिंधुदुर्गातील एकवेम स्वामी ठरलेत. या सोहळ्याकडे आता साऱ्या देशाच लक्ष लागून राहिलंय.