
नवी दिल्ली : भारतात सध्या १६० सीसी स्पोर्ट्स-स्टाईल बाईक सेगमेंटची क्रेझ वेगाने वाढत आहे. 'हिरो मोटोकॉर्प'ने (Hero MotoCorp) आपल्या लोकप्रिय एक्सट्रीम 160 आर 4 व्ही 'Xtreme 160R 4V' चे नवीन आणि अपडेटेड २०२६ मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ही नवीन बाईक लॉन्च करणार आहे.
अलीकडेच बजाज पल्सर एन 160 4 व्ही आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4 व्ही या दोन्ही बाईक लॉन्च झाल्या होत्या. यामध्ये अनेक नवीन फिचर्स आणि 'गुगल मॅप्स मिररिंग'सारखी स्मार्ट टेक्नलॉजी देण्यात आली आहे.
याबाबत कंपनीने टीझर रिलिज केला होता. यात २०२६ हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्ही (Xtreme 160R 4V) चे डिझाइन अगदी नवीन असेल. फ्यूल टँक, सीट, हेडलाइट्स आणि टेललाइट्सची स्टाईल पूर्वीपेक्षा अधिक चांगली करण्यात आली आहे. बाईकच्या 'एर्गोनॉमिक्स'मध्ये, विशेषतः सीटिंग पोझिशन आणि हँडलबारच्या अँगलमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच, अधिक चांगल्या कंट्रोलसाठी ब्रेकिंग सिस्टमही अपडेट केली जाऊ शकते.
तसेच यात नवीन 'टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर' देण्यात आला आहे. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेलमध्ये केवळ 'एलसीडी क्लस्टर' आहे. यामध्ये मूलभूत 'टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन'ची सुविधा मिळते. नवीन टीएफटी डिस्प्लेमुळे 'गुगल मॅप्स मिररिंग'ची सुविधा मिळू शकते. या बाईकमध्ये 'ऑटो-ब्राइटनेस ॲडजस्टमेंट' आणि 'लॅप टाइमर', 'क्रूझ कंट्रोल' यांसारखे फिचर्स असण्याची शक्यता आहे.
यात सध्याच्या मॉडेलमधील १६३.२ सीसी (163.2cc) सिंगल-सिलेंडर 4 व्ही इंजिन कायम ठेवले जाण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन १६.९ बीएचपी (16.9bhp) पॉवर आणि १४.९ एनएम (14.9Nm) टॉर्क जनरेट करते. हे शक्तिशाली इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
किमतीचा विचार करता सध्याच्या हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्ही (Hero Xtreme 160R 4V) ची किंमत 1.35 लाख रुपये ते 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. नवीन टीएफटी क्लस्टर आणि अपडेटेड स्टायलिंगमुळे २०२६ च्या नवीन मॉडेलच्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते.














