LIVE UPDATES

देवगडच्या तरुणाचा मृतदेह मालवणात गळफास घेतलेल्या स्थितीत

घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या 'त्या' महिलेने गूढ वाढविले
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 13:19 PM
views 93  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

मालवण : तालुक्यातील रेवंडी येथील तांडेलवाडी सडा परिसरात देवगड तालुक्यातील मिठबांव येथील श्रीधर नरे या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना एक महिला संशयास्पदरीत्या तेथून पळून जाताना दिसली. त्या महिलेला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला मिठबांव गावाच्या जवळील एका गावातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 घटनास्थळी दुचाकी, दारूच्या बाटल्या आणि रक्ताचे डाग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या बाबींमुळे घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.