
हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १४ धावांनी पराभव केला होता. बुधवारी होणाऱ्या या सामन्यात मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे श्रेयसच्या संघाचे लक्ष्य असेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी २० सामना बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. हा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथा टी-२० सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने या मैदानावर आतापर्यंत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी ६:३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात येतील.
टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथा टी-२० सामना पाहू शकता. तसेच, जिओ-हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटद्वारे तुम्ही हा सामना ऑनलाइन थेट पाहू शकता. तसेच 'डीडी स्पोर्ट्स' (DD Sports) वर सामन्याचा मोफत आनंद घेऊ शकता.
शाई होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ भारताचा पराभव करून मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याचा निकाल पुन्हा एकदा दोन्ही संघांमधील 'पॉवर-हिटर्स'च्या कामगिरीवर अवलंबून असेल. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि इशान किशननेही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजकडून होप आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी चांगली फलंदाजी केली आहे.
भारताचा टी 20 संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), नमन धीर, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल.
वेस्ट इंडीजचा टी 20 संघ
शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ज्वेल अँड्र्यू (यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, अमीर जांगू (यष्टिरक्षक), कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅमसन, शामार स्प्रिंगर, मॅथ्यू फोर्ड, अकील होसेन, शामार जोसेफ, गुडाकेश मोती, रोस्टन चेस, कीमो पॉल, रोमारियो शेफर्ड.














