LIVE UPDATES

बाजारपेठेतील चप्पल दुकान आगीत जळून खाक

नवदुर्गेमुळे वाचली बाजारपेठ ; मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आगीवर नियंत्रण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 07:07 AM
views 266  views

सावंतवाडी : बाजारपेठ येथील दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले असून यात दुकातील लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, आगीन रौद्ररुप धारण केलं असतं.


पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शेजारील सलून दुकानातील व्यक्तीस या घटनेची माहिती मिळताच त्यांनी बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात असलेल्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. तात्काळ २० ते २५ कार्यकर्त्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने नंदू गांवकर हे देखील मंडळात वस्तीला असल्याने त्यांनी तात्काळ पालिकेचा बंब घेऊन येत आगीवर नियंत्रण आणलं. अन्यथा, बाजारपेठेतील इतर दुकान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. मात्र, यात संजू निपाणीकर यांचे चप्पलाचे दुकान जळून लाखोंच नुकसान झाले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, राजू धारपवार, रामा गावडे, अर्चित पोकळे, चिरायू टोपले, सुरेश वाडकर, श्री. मुळीक, प्रसाद देऊलकर, देवबा देऊलकर, जुगनू देईलकर, शैलेश गवंडळकर, प्रसाद वागळे, राकेश चितारी, श्री. चितारी, अमित वेंगुर्लेकर आदींसह मंडळाचे सदस्य आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे बाजारपेठेतील नवदुर्गेमुळेच बाजारपेठ वाचली अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता.