
कणकवली : नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवात मंगळवारी रात्री देवीची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि सौ. नीलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती पार पडली.
यावेळी आमदार प्रमोद जठार, सौ. नीरजा जठार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाआरतीच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी देवीची मनोभावे आरती करून दर्शन घेतले.
भाजपा तालुका नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या महाआरतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवर आणि भक्तांच्या सहभागामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला.










