
कणकवली : भाजप कोकण विभागाचे आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे सेनेच्या दुर्गादेवीचे कणकवलीत दर्शन घेतले. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जठार यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
एकीकडे भाजपा विरोधात राज्य व देशभरात विरोधी पक्षाने आरोप करत खळबळ उडवून दिलेली असताना मात्र , या राजकारणाचा या धार्मिक कार्यक्रमांमध्ये लवलेश न दाखवता आमदार प्रमोद जठार हे स्वतः ठाकरे सेनेच्या दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेले. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यानी देखील त्यांचे स्वागत केले.
यावेळी नीरजा जठार, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, हर्षद गावडे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










