
कणकवली : इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अनेक कारणांमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही. पण, आपला देश बाबासाहेबांच्या संविधानावर, विचारांवर चालणारा असून हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
कणकवली रेल्वे स्थानक येथील निवारा शेड लोकार्पण व लिफ्ट बांधकाम शुभारंभानंतर पत्रकारांशी बोलताना नीतेश राणे म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीचा संपूर्ण जग सामना करत आहे. याच कारणास्तव इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही पूर्ण होऊ शकलेले नाही. आपला देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर, विचारांवर चालणारा आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मारक उशिराने व्हावे, अशी कोणाचीच इच्छा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारच्या प्रतिनिधींनी स्मारकाबाबत वारंवार बैठका घेतल्या आहेत. पण, युद्धजन्य स्थितीमुळे अनेक बाबी नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. तरीही आंबेडकरांच्या स्मारकाबाबत लवकरात लवकर तोडगा निघेल, असा विश्वासही नीतेश राणेंनी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








