
मुंबई : राज्य शासनाच्या कामगार विभागाने शासकीय प्रक्रिया पुनर्रचनेअंतर्गत (GPR) १८ योजना सुलभ केल्या असून, त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ८ योजनांचा समावेश आहे. यासंदर्भात १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज प्रक्रिया डिजिटल आणि ओटीपी आधारित करण्यात आली असून अर्ज निकाली काढण्याची कालमर्यादा ९० दिवसांवरून ४५ दिवस करण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनांतर्गत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना ९वी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येकी २० हजार रुपये व ११वी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये शैक्षणिक सहाय्य मिळेल (उत्तीर्ण झाल्यापासून १ वर्षाच्या आत अर्ज आवश्यक). तसेच वैद्यकीय पदवीसाठी वार्षिक १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवीसाठी वार्षिक ६० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र डिप्लोमा व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना हा लाभ लागू नाही.
याशिवाय नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला ३ लाख ५० हजार रुपये (किमान ३ वर्षे नोंदणी आवश्यक), अपघाती मृत्यू झाल्यास ६ लाख ५० हजार रुपये आणि किमान ७५ टक्के अपंगत्वासाठी २ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. महिला कामगारांना पहिल्या दोन प्रसूतींसाठी (नैसर्गिक किंवा सिझेरियन) २५ हजार रुपये प्रसूती सहाय्य मिळण्याची तरतूद आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








