
मुंबई : एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला १ ऑगस्टपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती परंतु ,आता राज्य सरकारने यात बदल करून एक महिन्याची मुदत वाढवली आहे. नागरिकांना आता १ सप्टेंबरपर्यंत वेळ मिळणार असून अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे त्या प्रवाशांना आता एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी अवधी मिळणार आहे .अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि अन्य सवलतधारकांना अद्याप ‘एनसीएमसी’ कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कोणत्या योजनांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक
एसटी प्रवासात सवलतींसाठी सध्या अनेक योजना सुरू आहे. त्यापौकी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५० टक्के सवलत, ६५-७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्त १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत पास या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
ताजी बातमी
View all

युवा रक्तदाता संघटनेचे युवक धावले मद.....
September 13, 2026

ज्येष्ठ मूर्तिकार विलास मांजरेकर यां.....
September 13, 2026

गणेश भक्तांच्यासेवेसाठी भाजपचा उपक्.....
September 13, 2026

सावंतवाडी नगरपरिषदेकडून 'पर्यावरणपू.....
September 13, 2026
संबंधित बातम्या
View all

देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मध.....
September 11, 2026

Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंध.....
September 11, 2026

Nitesh Rane : जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराच.....
September 10, 2026

CSMT Sawantwadi Express : चाकरमान्यांसाठी दररोज धावण.....
September 09, 2026






