LIVE UPDATES

देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 17:11 PM
views 41  views

पुणे : देहविक्रयाच्या प्रश्नावर भाष्य करणारे डॉ. रुपेश पाटकर लिखित ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकाचे प्रकाशन अशोक मनोहर मित्रपरिवार समितीतर्फे करण्यात येणार आहे. देहविक्रयाशी संबंधित सामाजिक प्रश्न, त्यामागील वास्तव आणि मानवी पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाकडे साहित्य आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ व सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अच्युत गोडबोले उपस्थित राहणार आहेत. सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक ४ वाजता एरंडवणे येथील बॉक्स थिएटर येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन ललित पब्लिकेशनतर्फे करण्यात आले आहे. सामाजिक वास्तवाशी निगडित महत्त्वाच्या विषयाला साहित्यिक माध्यमातून मांडणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.