LIVE UPDATES

सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आदित्य ठाकरे मैदानात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 17:52 PM
views 23  views

मुंबई : नीट पेपरफुटीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून दिल्लीत उपोषण करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंनी उभारलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना, वांगचुक आणि दिपके यांच्या समर्थनात आदित्य ठाकरेंनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वांगचुक आणि दिपकेंना पाठिंबा देण्यासाठी रविवारी १९ जुलैला शिवतीर्थावर एकत्र येण्याचे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. “हा लढा राजकीय पक्षाचा नसून, सर्वांचा आहे”, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.