LIVE UPDATES

bharat parva : भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 16, 2026 07:39 PM
views 53  views

सावंतवाडी : डिजिटल माध्यमातून कोकणची संस्कृती, परंपरा आणि पर्यटन वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या रहिवासी वृषाली सुधाकर रेडकर यांना भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत पर्व २०२६’ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

देशभरातील निवडक डिजिटल कंटेंट क्रिएटर्समध्ये त्यांची झालेली निवड ही सावंतवाडीसह संपूर्ण कोकणच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मुंबई तर्फे तिची निवड करण्यात आली होती. गुजरातमधील एकतानगर येथे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव पार पडला.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवात देशातील विविध राज्यांची सांस्कृतिक विविधता, लोककला, परंपरा, हस्तकला आणि पर्यटनवैभव यांचे दर्शन घडविण्यात आले. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनस्थळे डिजिटल माध्यमांतून जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘इनक्रेडिबल इंडिया’ या उपक्रमालाही यामध्ये महत्त्व देण्यात आले.

या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मांडण्याची जबाबदारी वृषाली रेडकर यांच्याकडे आली. विशेषतः कोकणचा निसर्ग, येथील समृद्ध परंपरा, खाद्यसंस्कृती आणि पर्यटनस्थळे यांना डिजिटल माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सहभागाला महत्त्व आहे.

स्थानिक पातळीवरून सुरू झालेला डिजिटल प्रवास राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचणे, ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून कोकणातील नव्या डिजिटल अभिव्यक्तीला मिळालेली दखल आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावंतवाडीच्या नावलौकिकात भर पडली असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


ताजी बातमी

View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026
TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला
November 16, 2026
पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026
Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
Uday Samant addresses Mahendra Dalvi's remarks against Sunil Tatkare
महायुतीमध्ये असताना एकमेकांवर टीका नको : उदय सामंत
November 16, 2026
मुख्याध्यापक संघाच्या ६५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला दोन्ही आमदारांकडून चार लाखांची देणगी
November 14, 2026
Goa Chief Minister Pramod Sawant speaking at the 34th All India Konkani Convention in Pune.
महाराष्ट्रात कोकणी अकादमी स्थापन करण्याची मागणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देवेंद्र फडणवीसांना लिहिणार पत्र
November 14, 2026