
कणकवली : नरेंद्र मोदी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठिशी असतात. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, याबाबत मी केंद्र सरकारचे आभार मानतो. काँग्रेस सकारच्या काळात कितीवेळा पेपर फुटले? त्यावेळी किती मंत्र्यांनी राजीनामा दिला? त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्पष्टीकरण तरी द्यायचे का? असा सवाल पालकमंत्री नीतेश राणेंनी केला.
पालकमंत्री नीतेश राणेंची पत्रकार परिषद येथील प्रहार भवन येथे पार पडली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जि. प. अध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणाईच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. यापूर्वी शेतकरी कायद्यांना शेतकरी बांधवांचा विरोध झाला, त्यावेळी ते कायदे मोदींच्या सरकारने मागे घेतले होते. नीट परिक्षा पेपर फुटीनंतर असे प्रकार होऊ नयेत, यासाठी अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतले. मोदींनी नेहमीच तरुणांचा आवाज ऐकला आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा दिला, यासाठी मी केंद्र सरकाचे अकाभार मानतो, असे राणे म्हणाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










