
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने'साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता इच्छुक पात्र साहित्यिक व कलावंतांना दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना सन्मानपूर्वक मानधन प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यास मुदत अपुरी पडलेल्या अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झालेल्या इच्छुकांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती, पात्रता निकष तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी दि. १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपला अर्ज सादर करावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










