
रत्नागिरी : राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या धक्कादायक निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी ही ट्वीट करत माहिती दिली आहे. पक्ष विरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही कारवाई केल्याचे श्री. राऊत यांनी म्हटले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










