
मुंबई : पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीसह विविध मागण्यांसाठी इ. पी. एस. पेन्शनर संघाच्या अखिल भारतीय संयुक्त कृती समितीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. देशभरातील सुमारे ८० लाख पेन्शनधारकांना किमान ९ हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी विभागीय पीएफ कार्यालयाच्या माध्यमातून ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नोटीस देण्यात येणार असून त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती समितीद्वारे प्रसिध्दिपत्रकामार्फत जाहीर करण्यात आली आहे.
प्रसिध्दिपत्रकात नमूद केल्यानुसार, पेन्शनवाढीच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये जनजागृती सभा घेण्यात येत आहेत. या सभांमधून पेन्शनधारकांना आगामी आंदोलनाची माहिती देण्यात येत आहे. पेन्शनवाढीसाठी विभागीय पीएफ कार्यालयाच्या माध्यमातून गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नोटीस देण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १५ डिसेंबर २०२६ रोजी दिल्लीतील पीएफ कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. तसेच १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘देश बचाओ-पेन्शन बढाओ’ आंदोलनाअंतर्गत महाधरणे करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांनी दिल्लीला जाण्या-येण्याची तिकिटे काढण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








