
सिंधुदुर्ग : आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात पडसाद उमटत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे सरकारकडून इंधनाच्या दरवाढीवर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारी कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरामध्ये भक्कम वाढ अपेक्षित आहे. सरकारी पेट्रोल कंपन्या या दर दिवसाला पेट्रोलमागे १८ रुपये आणि डिझेलमागे २५ रुपये प्रति लिटर नुकसान सहन करत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात जवळपास १८ रुपये दर वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तर डिझेल हे २५ रुपये प्रति लिटर दर वाढ करण्याची शक्यता आहे. किंमती वाढल्या जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.














