मुंबई : मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली मेसेंजर सेवा व्हॉट्स अॅपची सेवा ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत असून मेटा कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्स अॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.