सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहनांचा बूस्टर : पोलीस दल होणार अधिक सक्षम

पालकमंत्री नितेश राणे व गृहाराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार भव्य हस्तांतरण सोहळा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 18, 2026 23:47 PM
views 59  views

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या नव्या वाहनांचा भव्य हस्तांतरण सोहळा गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सकाळी १० वाजता राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


या सोहळ्यास विशेष निमंत्रित म्हणून नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, निलेश राणे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

नवीन वाहनांच्या समावेशामुळे पोलीस दलाची गती, प्रतिसादक्षमता आणि कार्यक्षमता अधिक वाढणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार आहे.

या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले आहे.