
सिंधुदुर्ग : शेती करायची इच्छा, मेहनतीची तयारी आणि जमिनीशी असलेली नाळ असूनही अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे आव्हान असते. मात्र योग्य वेळी मिळणारे अर्थसाहाय्य शेतकऱ्याच्या मेहनतीला बळ देऊ शकते. याचाच प्रत्यय हरिश्चंद्र परब यांच्या शेतीतून येतो. जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्याच्या जोरावर त्यांनी आपल्या एक एकर जागेत विविध प्रकारची शेती फुलवून स्वावलंबनाची वाट धरली आहे.
भाजीपाला उत्पादनासह विविध पिकांची लागवड करत परब यांनी आपल्या जमिनीचा प्रभावी वापर केला आहे. शेतीमध्ये आवश्यक असणारी साधने, लागवडीसाठी लागणारा खर्च आणि उत्पादनासाठी आवश्यक बाबींना अर्थसाहाय्याची जोड मिळाल्याने शेतीला अधिक सक्षमपणे पुढे नेणे त्यांना शक्य झाले.
शेतकऱ्यांना केवळ कर्जपुरवठा न करता त्यांच्या शेतीला आणि व्यवसायाला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेने विविध उपक्रमांवर भर दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शेतकरी केंद्रित धोरणाला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्याच्या गरजेनुसार अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यावर बँकेचा भर राहिला आहे.
हरिश्चंद्र परब यांचा प्रवास हे त्याचे एक उदाहरण ठरते. पूर्वी केवळ शेतीची क्षमता असलेली एक एकर जमीन आज विविध पिकांनी हिरवीगार झाली आहे. भाजीपाला उत्पादनातून मिळणारे उत्पन्न कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यास हातभार लावत असून, शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता उत्पन्नाचे सक्षम साधन म्हणून पाहण्याची दृष्टीही निर्माण झाली आहे.
शेतकरी हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक मंडळाने शेतकरी, महिला, छोटे उद्योजक आणि ग्रामीण भागातील विविध घटकांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला आहे.
हरिश्चंद्र परब यांच्या एक एकर शेतीत आज फुललेली हिरवाई ही केवळ पिकांची नाही, तर आर्थिक पाठबळ, मेहनत आणि योग्य नियोजनातून उभ्या राहिलेल्या आत्मनिर्भरतेची कहाणी आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








