नितेश राणे यांचे फडणवीस व शिंदेनी केलं अभिष्टचिंतन

Edited by: संदीप देसाई
Published on: June 23, 2025 23:48 PM
views 184  views

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होम पिचवर राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन सोमवारी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा वासियांनी कणकवली इथं केलं. तेथून सायंकाळी मुंबईत परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यांवेळी मंत्री नितेश राणे यांना वाढदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत त्यांचं अभिष्टचिंतन केलं.