मला अजून आठवतंय, सात आठ वर्षांपूर्वी माझा दहावीचा रिझल्ट लागला आणि ऍडमिशनची धावपळ सुरू झाली. मार्क्स चांगले होते, त्यामुळे फार अडचण येणार नव्हती. पहिल्या दिवशी ऍडमिशनसाठी बाहेर जायला निघालो, तसे बाबा म्हणाले, सगळ्या डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स काढून ठेव, एक कॉपी आपल्याकडे, एक त्यांच्याकडे....
तेव्हाही मला कळलं नाही.... आजही कधी कधी मला प्रश्न पडतो, ऑनलाईनच्या काळात हे झेरॉक्स का काढायला सांगत होते?? फोनवरून डॉक्युमेंट्स मेल केली झालं काम.... पण नाही, प्रत्येक डॉक्युमेंटच्या किमान दोन कॉपीज काढून ठेवाव्यात, असा त्यांचा आग्रह असायचा आणि ती कॉपीजनं भरलेली पिशवी घेऊनच मी ऍडमिशन प्रोसेससाठी बाहेर पडायचो....
आज जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा कळतं, ती नुसती पिशवीभर डॉक्युमेंट्स नव्हती, पिशवीभर स्वप्नं होती माझी.... ती पिशवी माझा आत्मविश्वास कित्येक पटींनी वाढवत होती.... ती पिशवी मला माझी स्वप्नं जपायला शिकवत होती.... त्या स्वप्नांचं महत्व आणि त्या पिशवीचं मूल्य मला आज खऱ्या अर्थानं समजतंय, कारण स्वप्नांना ऑप्शन्स नसतात....
ॲडमिशनप्लेक्स..... कारण स्वप्नांना ऑप्शन्स नसतात....
आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आजच भेट द्या
आणि रजिस्ट्रेशन करा
www.admissionplex.com