तीराळी–दोडामार्ग रस्त्यावर झरे-आंबेलीत भीषण अपघात: दुचाकीस्वारासह दोघे गंभीर

ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर बाबुराव धुरिंचा हल्लाबोल!
Edited by:
Published on: February 13, 2026 09:38 AM
views 139  views

 दोडामार्ग : प्रतिनिधी

तीराळी–दोडामार्ग रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी मोठा अपघात घडला. अर्धा बाजूने रस्ता खोदून ठेवलल्याने त्याचं खोदलेल्या रस्ता खड्ड्यात दुचाकी घसरून दोन युवक गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक होतं लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर जिल्हा पोलीस अधीक्षक गुन्हा दाखल करणार का? असा खडा सवाल उपस्थित केलायं.


ते म्हणाले की, संबंधित ठिकाणी कोणतीही इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले नाहीत का? असा सवाल उपस्थित करत

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना बाबुराव धुरी यांनी प्रशासनावर आणि संबंधित ठेकेदारावर जोरदार टीका केली.

“आमच्यावर गुन्हे दाखल करताना ज्या तत्परतेने पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली, तीच कार्यतत्परता आता बेफिकीरपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर दाखवली जावी. निष्पाप युवकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत,” अशी जोरदार मागणी धुरी यांनी केलीय.

दरम्यान, प्रवाशी आणि नागरिकांनीही या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रस्ते कामांदरम्यान सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचे लक्ष लागले आहे.