10 th RESULT SPECIAL | आज दहावीचा निकाल.. मग हे जरूर वाचा !

पालक-विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मौलिक माहिती
Edited by: टीम ॲडमिशनप्लेक्स
Published on: June 02, 2023 08:50 AM
views 599  views

'तुमचं यश तुमच्या पेपरमधल्या मार्क्सवर नाही तर त्याच्यापुढं जाऊन तुम्ही आयुष्यात कुठले लँडमार्क्स तयार करताय, त्यावर अवलंबून असतं....'




नुकत्याच लागलेल्या रिझल्टनंतर टीव्हीवरच्या मुलाखतीत कोणीतरी शिक्षणतज्ज्ञ बोलत होता. हे ऐकता ऐकताच आशिषनं शेजारीच ठेवलेल्या फाईलकडे नजर टाकली. सगळ्यात वर त्याची मार्कशीट लावलेली होती. आजकाल नव्वद टक्क्यांना कोण विचारतंय? जग कितीतरी पुढं गेलंय.... अजून अभ्यास करायला हवा होता का?? नेमकं काय कमी पडलं हेच त्याला समजत नव्हतं. आयआयटीच्या ९८ किंवा ९९ टक्क्यांच्या कट ऑफमध्ये आपल्या नव्वद टक्क्यांची काय किंमत असणार आहे?


याच सगळ्या विचारात असताना अचानक त्याचा फोन वाजला. डॅड कॉलिंग.... 'काय रे, कुठं आहेस? ती काऊन्सेलिंगची अपॉइंटमेंट ठरली होती ना, मी पोचलोय....' तो साफ विसरून गेला होता. काहीशा नाराजीनंच त्यानं टीव्ही बंद केला आणि फाईल घेऊन बाहेर पडला.



ॲडमिशनप्लेक्सच्या ऑफिसमध्ये तो आणि त्याचे वडील काऊन्सेलरसमोर बसले होते. त्याची मार्कशीटही समोर होती. त्याच्या डोळ्यांत त्याच्या मनातलं अपयश स्पष्ट दिसत होतं. काऊन्सेलरच्या अनुभवी नजरेनं ते ओळखलं, पण ते न दाखवता त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. जसजसं बोलणं पुढं गेलं, तसतसा आशिषचा हरवलेला आत्मविश्वास परत येऊ लागला. गोष्टी आपल्या मनाप्रमाणे न घडणं, हे अपयश नाही तर ज्या क्षेत्रात आपण जाऊ तिथं आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, हेच खरं यश, मग ते कुठलंही क्षेत्र असो.....


हळूहळू आशिषला त्याचे कष्टानं मिळवलेल्या नव्वद टक्क्यांचाही अभिमान वाटू लागला. ॲडमिशनप्लेक्समधून आशिषला फक्त काऊन्सेलिंग मिळालं नाही तर त्याच्या करिअरलाही एक वेगळी दिशा मिळाली. त्याला त्याच्या यशाचा मार्ग दिसला, जो मार्कशीटवर मावणारा नव्हता. ॲडमिशनप्लेक्सनं त्याला अजून एक महत्वाचा धडा दिला, 'यश मिळवण्यासाठी स्वप्नं सत्यात उतरवण्याची ताकद मिळवणं गरजेचं असतं कारण स्वप्नांना ऑप्शन्स नसतात....




ॲडमिशनप्लेक्स..... कारण स्वप्नांना ऑप्शन्स नसतात....


आजच क्लिक करा आणि निवडा आपल्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग 
www.admissionplex.com